जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा तसेच जळगाव शहर विधानसभा मतदार संघांतर्गत स्विपच्या माध्यमातून पिंप्राळा तसेच हरी विठ्ठल नगर परिसरात मतदान जनजागृती च्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन बी एल ओ १५४ महेंद्र पारधी, बी एल ओ १६९ प्रभाकर खराटे, बी एल ओ १८७ खुशाल पाटील यांनी सुपरवायझर योगेश भालेराव तसेच विश्वनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सदर रॅलीमध्ये बालमोहन विद्या मंदिराचे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित राहिले तर शाळेचे मुख्या. मनीषा कानडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मतदान हा माझा अधिकार तो मी बजावणारच, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो.., तुमचे मत तुमचा आवाज अशा घोषणांनी परिसर दुमदुमला व हिमुख्यालय विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.