शासकिय राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थींनीना यश

chopada

 

चोपडा प्रतिनिधी । पुणे येथील आझम कॅम्पस पूना कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, आयोजित कलाउत्सव अंतर्गत राज्यस्तरीय कलास्पर्धा २०१९ घेण्यात आल्या असून या स्पर्धेत चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थिंनी लिपिका सचिन पाटील, कलाप्रकार चित्रकला व सृष्टी जैन, कलाप्रकार तबला यात राज्यस्तरावर सहभागी होऊन उपविजेत्या ठरल्या आहेत.

या विद्यार्थ्यांना त्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या प्रेरणेने व दोन्ही विद्यार्थिनींचे वर्गशिक्षक पवन लाठी व हेमराज पाटील यांच्या सहकार्याने त्या राज्य स्तरापर्यंत पोहोचू शकल्या. जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिंनी होत्या. यांच्या या राज्यस्तरीय सहभागाबद्दल विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, वासंती नागोरे, शिक्षकवृंद, पालकवृंद व विद्यार्थीवर्ग यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी सोशल सायन्स, आर्ट अँड स्पोर्ट्स डिपारमेंट एस.सी.ई.आर.टी. महाराष्ट्र राज्य पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर नामदेव शेंडकर, स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र पुणेचे डायरेक्टर दिनकर पाटील, आझम कॅम्पस पुणे डायरेक्टर डॉ. आबेदा इनामदार, समता विभाग उपसंचालक डॉ.शोभा खंदारे, पुणे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख कलादेवी आवटे, संपूर्ण कार्यक्रम स्पर्धा प्रमुख पद्मजा रांबरुळ, महेश शेरकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र विद्यार्थींना देण्यात आले.

Protected Content