विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिले ऑनलाईन बातमी लेखनचे प्रशिक्षण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे दैनिक पुण्यनगरीचे जाहिरात व्यवस्थापक महेंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना बातमी लेखन कसे करावे? तसेच जाहिरात कशी तयार करावी? यासंबंधी ऑनलाइन झूमच्या माध्यमातून (दि.24) गुरुवार रोजी 8 वीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातील बातमीलेखन व जाहिरात लेखन या पाठयांश घटकाविषयी मार्गदर्शन केले.

यामध्ये बातमी कशी असावी?, बातमीची हेडिंग कसे असावे? तसेच बातमीचे शीर्षक, उपशीर्षक आणि बातमीची वैशिष्ट्ये यासंबंधीची सविस्तर माहिती सांगितली. बातमी वाचल्यानंतर कोणत्या स्वरूपाची आहे हे आकलन होणे गरजेचे आहे. बातमीचे शीर्षक सुद्धा मुद्देसूद व बोलके असावं तसेच बातमी लेखन करताना आपलं लेखन कौशल्य तसेच भाषेचे उत्तम ज्ञान, व्याकरणाची जाण, सोपी सुटसुटीत वाक्यरचना, चौफेर वाचन हे गुण आपल्याकडे असणे आवश्यक आहे, असं त्यांनी मार्गदर्शनात सांगितलं. तसेच बातमीची विविध क्षेत्रे त्याबद्दल त्यांनी माहिती सांगताना सांस्कृतिक क्रीडा, कृषी, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, दैनंदिन घटना इत्यादी विविध क्षेत्रांची माहिती मुलांना सविस्तरपणे सांगितली.

जाहिरात लेखन करताना जाहिरात कशी करावी? व पूर्वीची जाहिरातीची पद्धत आणि आता ची  जाहिरातीचे माध्यम यातील फरक उदाहरणासह स्पष्ट करून सांगितला. पूर्वी दवंडी, पथनाट्य, प्रवचन याद्वारे जाहिरात केली जायची आता मात्र या जाहिरातीचे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, डिजिटल मीडिया यासारख्या जाहिरातींच्या प्रकारांचे उदाहरणासहित वर्गीकरण स्पष्ट करून सांगितले.  जाहिरात एक कला आहे. ती तयार करत असताना यमक जुळणारे रचना असावी, कमीत कमी शब्दात मांडणी असावी, जाहिराती चा लोगो क्रिएटिव्ह असला पाहिजे ,रंगसंगतीही नेत्रदीपक असायला हवी, यासारख्या बारीक-सारीक गोष्टींची माहिती माननीय जाहिरात व्यवस्थापक महिंद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना समर्पक शब्दात सांगितली. तसेच विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या समस्या व शंका आणि त्यांचे प्रश्न यांचे समाधान त्यांनी पूर्ण केले.

मुलांनी त्यांना प्रश्नोत्तराच्या वेळात विविध प्रश्न विचारले.

त्यातील प्रश्न… कुठे काही घडले हे कसे कळते?

बातमीची हेडिंग कसे असावे? बातमी कशी लिहावी बातमी? बातमीचे हेडिंग व उपहेडिंग कसे असावे? यातील फरक काय? जाहिरातीचे प्रकार कोणते? होल्डिंग जाहिरात कशी असते? यासारखे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले असता त्यांना समर्पक उत्तर महेंद्र माळी यांनी दिली व त्यांचे शंकासमाधान केले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील सर ,समन्वयिका वैशाली पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, समन्वयिका वैशाली पाटील यांचे सहकार्य लाभले

 

Protected Content