विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीत १००% यशाची परंपरा कायम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनधी | शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनविन पायंडा निर्माण करणारी संस्था म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान या संस्थेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ओळखले जाते. गेल्या एक दशकापासून विवेकानंद प्रतिष्ठानने शालेय शिक्षणासोबतच उच्च शिक्षणात देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य महाविद्यालयाव्दारे केले जात आहे. जेईई आणि नीट सारख्या स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी देखील महाविद्यालयाव्दारे तज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळवता यावे या उद्देशाने महाविद्यालयात प्रशस्त प्रयोगशाळा समृध्द ग्रंथालय आधुनिक संगणक विभाग आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या सर्व सुविधेचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील होतो आणि विद्यार्थ्यानी मिळविलेले हे यश याचीच प्रचिती आहे या वर्षी लागलेल्या निकालानुसार महाविद्यालयातून विनय किशोर पाटील याने ८९.६७ टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला असून श्रेयस पालोड ८५.६७ याने दुसरा क्रमांक, मयूर सैठवाल ८५.०० तिसरा क्रमांक, विवेक सुतार ८२.१७ चौथा क्रमांक तर विनायक सुतार ८१.३३ याने पाचवा क्रमांक प्राप्त केलाआहे विद्यार्थ्यांच्या यशासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, सचिव श्री. रत्नाकर गोरे, सौ.हेमाताई अमळकर, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री विनोद पाटील प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर वाघ व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Protected Content