केसीईच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा ९८.२४ टक्के निकाल

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मू. जे. महाविद्यालय) ने फेब्रुवारी/मार्च -२०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात आपली गौरवशाली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या परीक्षेत महाविद्यालायाचा एकूण निकाल ९८.२४ टक्के लागला आहे.

अग्रवाल माधवी अमीत ही विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत ९५.८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात सर्व प्रथम आली. नुपूर उमेशकुमार सेठिया ही विद्यार्थिनी ९२ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. कला शाखेतून साठे सृष्टी श्रीपाद ही विद्यार्थिनी ९१.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर मेटे ऋषिकेश सुधाकर हा विद्यार्थी ५९.३३ टक्के गुण मिळवून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत सर्वप्रथम आलेला आहे.

अकाउंट या विषयात ३३ विद्यार्थ्यांना, संस्कृत विषयात ११ विद्यार्थ्यांना, माहिती व तंत्रज्ञान या विषयात १० विद्यार्थ्यांना तसेच गणित विषयात एका विद्यार्थ्यांला असे एकूण ५५ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले. वाणिज्य शाखेत ७७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त, तर विज्ञान शाखेत १५ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त, कला शाखेत ९ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. वाणिज्य शाखेत २६७ विद्यार्थ्यांनी, विज्ञान शाखेत ९२ विद्यार्थ्यांनी, तर कला शाखेत १८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.

वाणिज्य शाखेत प्रथम अग्रवाल माधवी अमित ९५.८३%, व्दितीय मुंदडा भक्ती प्रवेश ९५.६७%, तृतीय मुनोत रिया रुपेश ९५.३३%.
विज्ञान शाखेत प्रथम – नुपूर उमेशकुमार सेठिया ९२.००%, व्दितीय पियुष नितीनकुमार जांगडे ८९.३३%, तृतीय रोहित रवींद्र पाटील ८८.८३%
कला शाखेत प्रथम- साठे सृष्टी श्रीपाद – ९१.६७%, व्दितीय- पंडित गीता अखिलेशकुमार ९१.१७%, तृतीय- चौधरी नेहल अशोक ९०.५०%.

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एम.सी.व्ही.सी) प्रथम- मेटे ऋषिकेश सुधाकर ५९.३३%, व्दितीय- सपकाळे गजानन धोंडू ५६.००%, तृतीय- भोई विशाल रमेश ५४.५०%.
सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष नंद्कुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या करुणा सपकाळे, पर्यवेक्षक आर. बी. ठाकरे, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, कला शाखा व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी केले.

Protected Content