विठुनामाच्या रंगात रंगले ऑर्किडचे चिमुकले

school

चोपडा प्रतिनिधी । यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधत शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यात विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या जयघोष करत सहभाग नोंदवला. याप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा व दिंडीचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत असलेले पंचायत समितीचे (शिक्षण विभाग) केंद्रप्रमुख युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वारकरी पोषाखात असलेले विद्यार्थ्यांनी माऊली-माऊली गीतावर नृत्य केले. विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठलाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष यांच्या वतीने विद्यार्थ्यांना राजगिराचे लाडू आणि केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, आप्पासो रामदास बापू पाटील, व्ही.के.पाटील (नंदुरबार), संभाजी पाटील, डॉ. तृप्ती पाटील, प्राचार्या मिस परमेश्वरी आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ तर आभार प्रदर्शन मिस लिपिका नागदेव यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपाली पाटील, श्रद्धा देशमुख, सपना पवार, रिया कलानी, अनिता पवार आदींनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content