जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय डाक विभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” ९ ते १२ ऑक्टोबर “भारतीय पोस्ट सप्ताह ” साजरा करण्यात आला. यानिमित्त ए.टी.झांबरे विद्यालयाच्या इ.५ वी.च्या विद्यार्थ्यांनी मुख्य पोस्ट ऑफिसला भेट दिली.
या प्रसंगी मुख्य पोस्ट मास्तर या.एस.एम.कुलकर्णी यांचे बी.डी.झोपे यांनी व सहाय्यक पोस्ट मास्तर ललित बोरकर यांचे एस.एम.शिरसाठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कुलकर्णी साहेबांनी पोस्ट सप्ताह चा उद्देश व त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच बोरकर यांनी भारतीय डाक विभागाच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या आधुनिक बदला संबंधी व भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास एम.वाय. ठोसरे,व आर.एन तडवी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार ई.पी.पाचपांडे यांनी मानले.