कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने १५ बाधित रूग्ण आढळले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली.

 

जळगाव जिल्ह्यात आज नव्याने पंधरा कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ५, भुसावळ तालुक्यातून ३, पाचोरा तालुक्यातून ५, भडगाव आणि धरणगाव तालुक्यातून प्रत्येकी १  असे एकुण १५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ७८८ कोराना रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी १ लाख ४९ हजार ११० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर २ हजार ५९२ कोरोना बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ८५ कोरोना रूग्ण विविध रूग्णालयात  उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content