धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा ;  ३५० उपवर मुला-मुलींनी दिला परिचय (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 05 at 7.32.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | मांगल्य वधू-वर सूचक व संकलन केंद्र जळगाव व धनगर समाज महासंघ मल्हार सेना कर्मचारी संघटना अहिल्या महिला संघ आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्यात ३५० उपवर मुला-मुलींनी आपला परिचय करून दिला. तसेच मेळाव्यात २ विवाह जुळले.

धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक केशव पातोडे हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक महापौर सीमा भोळे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. पंचायत समितीच्या उपसभापती संगीता चिंचोरे, माजी सभापती सुरेश धनके, डेप्युटी आरटीओ शाम लोही, केंद्र संचालिका रेखा न्हाळदे, प्रभाकर न्हाळदे, प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, मनोज चौधरी, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, हिलाल सोनवणे, डॉ. संजय पाटील, गणेश बागुल, संदीप मनोरे, महेंद्र सोनवणे, रघुनाथ सोनवणे, संदीप विठ्ठल बोरसे, राजेश देशमुख, भरत यवस्कर, समाधान चिंचोरे, अरुण ठाकरे, सुभाष करे, मंजुषा सूर्यवंशी, भरत यवस्कर, कृष्णा ठाकरे, रामचंद्र ठाकरे, धर्मा बापू सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रेखा न्हाळदे, प्रभाकर न्हाळदे यांनी केले होते. सूत्रसंचालन ज्योती पाटील तर आभार गणेश बागूल यांनी मानले. मनोगत डेप्युटी आरटीओ शाम लोही, विठ्ठल बोरसे, सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा देऊन आपल्या विशेष शैलीत मुला-मुलींनी आपला जोडीदार कसा निवडावा हे सांगितले. मी बारावी पास आणि आता कॅबिनेट मंत्री त्यामुळे नोकरीवाला मुलगा न पाहता निर्व्यसनी कष्ट करणारा मुलाची निवड करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापौर सीमा भोळे यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस महेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष प्रवीण पवार, सुनील खोमणे, विजय पवार, प्रमोद सोनवणे, पिंटू मनोरे, दिगंबर सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content