Home Cities चोपडा विश्राम तेले यांना राज्यस्तरीय ग्रीन मॅन पुरस्कार

विश्राम तेले यांना राज्यस्तरीय ग्रीन मॅन पुरस्कार

0
32
vishram tele chaugaon


vishram tele chaugaon

चोपडा प्रतिनीधी । तालुक्यातील चौगाव येथिल वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे चोपडा तालुका संपर्क प्रमुख विश्राम तेले यांना ग्रीन मॅन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पर्यावरण, वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जागतीक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, धुळे तर्फे विश्राम तेले यांना राज्यस्तरीय निसर्गदूत ,ग्रीन मँन आवार्ड २०१९ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना गेल्या वर्षीच पर्यावरण रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी घोरपडे,नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक अतुल निकम,गट शिक्षणाधिकारी पी टी शिंदे, खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धमाणे विद्यालयाचे अध्यक्ष आर डी पाटील ,निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे साहेब,प्रदेश सचिव संतोषराव पाटील, निसर्ग मित्र समितीचे चोपडा तालुकाध्यक्ष वासुदेव महाजन आदी उपस्थीत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound