विराट कोहलीला नवीन विक्रम नोंदविण्याची संधी

virat kohli

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । टीम इंडियाची यंग ब्रिगेड आज दि. 8 ऑगस्ट रोजी गयानाच्या मैदानावर वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. या लढतीत कर्णधार विराट कोहलीला एकाच वेळी 2 विक्रम नोंदवण्याची संधी आहे. त्याने १९ धावा केल्या तर तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला मागे टाकू शकतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विक्रम आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे. या लढतीत १९ धावा काढल्या तर, तो वनडेमध्ये वेस्ट इंडिजविरुध्द सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादच्या नावावर हा विक्रम आहे. वनडेमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो अव्वल फलंदाज ठरणार आहे. मियाँदादने ६४ सामन्यांतील ६४ डावांत ३३.८५ च्या सरासरीने १९३० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि १२ अर्धशतके आहेत. तर विराटने ३३ डावांमध्ये ७०.८१ च्या सरासरीने १९१२ धावा केल्या आहेत. वनडेत वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने सर्वाधिक 7 शतके आणि १० अर्धशतके ठोकली आहेत.

Protected Content