रावेरात भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी दिलेल्या नोटीसीनंतर रावेर येथील भाजप कार्यालयासमोर नोटीसीच्या विरोधात तालुका भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली.

रावेर शहरातील भाजपा कार्यालया समोर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांना मुंबई पोलीसांकडुन पाठवलेल्या नोटीशीची होळी करुन तालुका भाजपा तर्फे  निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, पि. के. महाजन, धनगर नेते संदीप सावळे, माजी तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, सि.एस. पाटील, आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content