यावल येथे आ. लताताई सोनवणे यांच्याहस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी १३ मार्च रोजी हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार लताताई सोनवणे यांच्याहस्ते तोल काट्याचे पूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, संचालक कांचन फालक , योगराज बऱ्हाटे, सुनिल बारी, पुंजो पाटील, सत्तार तडवी यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे , शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, शिवसेना शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, संतोष धोबी, पप्पु जोशी, सेनेचे अजहर खाटीक, युवा मोर्चाचे व्यंकटेश बारी, विजय मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने ऑफलाईन पद्धतीने १३०० शेतकऱ्यांच्या नोंदणी करण्यात आली असुन मे अखेर पर्यंत ही शासन आधारभुत किमतीत हरभरा खरेदी सुरू राहणार आहे. यावेळी शासनाचे मार्केटींग अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी अनुपस्थिती होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी मानले.

Protected Content