कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; पानटपरी चालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करणार्‍या जळगाव शहरातील महाबळ रोडवर महापालिकेच्या कार्यालयाजवळ असलेल्या साई पान सेंटरवर रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पानटपरी चालक वाल्मिक नामदेव महाजन वय २६ रा. समतानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सुशील चौधरी, सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी हे २६ रोजी रात्री दुकाने बंद करण्यासाठी गस्त घालत होते. ९ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश असतांनाही रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास महाबळ रोडवर महापालिका कार्यालयाजवळ असलेले साई पान सेंटर हे सुरु असल्याने पानटपरीवर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात कर्मचारी सुशील अरुण चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content