जळगाव प्रतिनिधी । प्रतिथयश कृषी व्यावसायिक तथा राष्ट्रवादीचे माजी जि.प. गटनेते विनोद तराळ यांची महाराष्ट्र राज्य अॅग्रो डीलर्स असोसिएशन म्हणजेच ‘माफदा’ या संस्थेच्या राज्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी जि.प. गटनेते विनोद तराळ यांची महाराष्ट्र राज्य अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात तराळ यांची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांच्यासह अॅड.कैलास ठोळे, सचिव बिपीन कासलीवाल यांच्यासह राज्यातील प्रत्येक विभागातून जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. विनोद तराळ यांना या अतिशय महत्वाच्या अशा संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली असून याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.