विनोद बोरसे यांना केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विनोद बोरसे यांना केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार महाराष्ट्र केळी उत्पादक संघाच्या वतीने आज कंदार ता.करमाळा जि. सोलापूर येथे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

विनोद बोरसे यांनी पारंपारिक लागवडीत बदल करत लागवडीचे योग्य अंतर योग्य खत व्यवस्थापन घड व्यवस्थापन फळ व्यवस्थापन रोपांची लागवड जागातिक बाजार पेठेत निर्यातक्षम दर्जाची मालाची गुणवत्ता व टिकवण क्षमता तसेच जमिनीच्या आरोग्य व पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब त्यात जिवामृत, कीडरोगावर विविध नैसर्गिक निविष्ठा बनवणे व परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे सर्व बाबीवर कार्य केल्याची दखल घेतली. केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेत कार्याची पावती म्हणुन त्यांना केळी रत्न पुरस्कार दिला. यावेळी पिचर्डे येथील उपस्थित शेतकरी बांधव रविद्र पाटील राजेद्र पाटील शिवाजी पाटील प्रविण कुभांर दिपक महाजन गोरख महाजन, भुषण येवले उपस्थित होते.

Protected Content