Home क्राईम जळगावात तरूणीचा विनयभग; एकावर गुन्हा दाखल

जळगावात तरूणीचा विनयभग; एकावर गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्टेट बँक कॉलनीत राहणाऱ्या तरूणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक कॉलनीत २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा शैलेंद्र वासूदेव पाटील हा तरूणी एकटी घरात असतांना घराच्या मागच्या दरवाजातून येवून तिचा हात पकडला. तु मला मारायला मुले का पाठविली असे म्हणून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर नंतर पिडीत तरूणीने कुटुंबियांना सांगितले. पिडीत तरूणीसह कुटुंबियांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी शैलेंद्र वासूदेव पाटील रा. स्टेट बँक कॉलनी याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound