सोशल मीडीयावर बनावट खाते तयार करून मुलीचा विनयभंग

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर मुलीच्या नावाचे बनावट खाते तयार करून अश्लील मॅसेज आणि मुलींचे फोटो अपलोड करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याच्या मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून संशयित आरोपी रिहान मुनाफ पांडे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव याने अश्लिल मॅसेज केले. त्यानंतर गावातीलच इतर तीन मुलींसोबतचा एक फोटो अपलोड करून त्यांची बदनामी करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रिहान मुनाफ पांडे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

Protected Content