सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा तालुक्यातील जानोरी शिवरातील जंगलामध्ये ४ गावठी दारूभट्यांवर सकाळी सावदा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना या दारूभट्याबाबतची गोपनीय माहिती आज सकाळी मिळाली होती. त्यानंतर सकाळी सलग ५ तास जंगलामध्ये शोध घेवून या ४ भट्टया शोधून नष्ट करण्यात आल्या आहे.
याबाबत सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे सावदा पोलिस ठाण्याचे सहपोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले आहे. सदरची कारवाई ही वरिष्ठाच्या आदेशाने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, सहायक फौजदार खोडपे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक सैंदाने, पोलिस नाईक तडवी, पो कॉ जोशी यांच्या पथकाने केली आहे.