Home प्रशासन शिरसाळा गावचा अभिमान वाढला ; अग्निवीर जवान कृष्णा गोसावी यांचे जल्लोषात स्वागत

शिरसाळा गावचा अभिमान वाढला ; अग्निवीर जवान कृष्णा गोसावी यांचे जल्लोषात स्वागत

0
10


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा (मारोती) येथील युवक कृष्णा गोसावी यांची भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून निवड झाल्याने गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या वतीने शिरसाळा येथे भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

संभाजीनगर येथे झालेल्या निवड चाचणी आणि परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत कृष्णा गोसावी यांनी अग्निवीर भरती प्रक्रियेत यश मिळवले. भारतीय सैन्यात सेवा करण्याचा बहुमान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण शिरसाळा गावाचा गौरव वाढला आहे. कृष्णा गोसावी यांच्या या यशानिमित्त गावातील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत सोहळा आयोजित केला होता. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी तसेच “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल होणाऱ्या कृष्णा गोसावी यांचे ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आणि जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या यशामुळे गावातील तरुणांमध्येही सैन्य सेवेसाठी प्रेरणा निर्माण झाली आहे. या स्वागत सोहळ्याप्रसंगी मोठे बाबा सुरेश गोसावी, प्रभाकर गोसावी, अशोक गोसावी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, मित्रमंडळी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी कृष्णा गोसावी यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय सैन्यात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कृष्णा गोसावी यांच्या यशामुळे शिरसाळा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना प्रेरणा मिळणार आहे.


Protected Content

Play sound