पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये सर्व शासकीय योजनांसह अद्ययावत सुविधा उपलब्ध असून यामुळे परिसरातील रूग्णांना लाभ होणार असल्याची माहिती संचालक डॉ. भूषण मगर पाटील व डॉ. सागर गरूड यांनी दिली.
आज डॉक्टर्स डे साजरा केला जात आहे. या अनुषंगाने येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर पाटील व डॉ. सागर गरूड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हॉस्पीटलबाबतची भूमिका मांडली. ते म्हणाले की, पाचोर्यासह परिसरात अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आम्ही आधी मंगलमूर्ती आयसीयू युनिटच्या माध्यमातून सेवा सुरू केली. यानंतर याला विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये परिवर्तीत करण्यात आले. यामध्ये विविध सुपर स्पेशालिटी या प्रकारातील सेवा प्रदान करण्यात येत आहेत. १२० खाटांचे हे उत्तर महाराष्ट्रातील अद्ययावत हॉस्पीटल असून यात आज उपलब्ध असणार्या जवळपास सर्व सेवा प्रदान करण्यात येत असल्याची माहिती डॉ. मगर पाटील यांनी दिली.
तर डॉ. सागर गरूड यांनी विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये महात्मा गांधी जीवनदायी योजना, आयुष्यमान भारतसह सर्व शासकीय योजना उपलब्ध असून यामुळे गोरगरीबांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा अगदी मोफत मिळणार असल्याची माहिती दिली.
पहा : विघ्नहर्तामधील सुविधांबाबत डॉ. भूषण मगर पाटील व डॉ. सागर गरूड यांनी दिलेली माहिती.