धारदार शस्त्र घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल : चौघांना अटक

 

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणाऱ्या तरुणांनी घरात धारदार शस्त्रे घेऊन नाचत व्हिडीओ तयार केला. व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपास केला. त्यानुसार चौघांना शनिवारी २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आली आहे. चौघांकडून २ चॉपर, १ तलवार आणि १ चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर परिसरात गुन्हा करण्यात आला

छत्रपती शिवाजीनगर हुडको भागात मंदिराजवळ व्हिडीओमधील इसम दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले. यात पोलिसांनी दिपक सखाराम बागुल (वय-३२), तुषार संतोष जाधव (वय-२२), मनिष राजेंद्र बि-हाडे (वय-२०), संतोष कडु तायडे (वय-३२, सर्व रा.शिवाजी नगर हुडको) यांना अटक केली आहे. व्हिडीओमधील तलवार, कोयता, चॉपर हे त्यांनी त्यांचे घरी ठेवलेले पंचासमक्ष काढून दिले.

कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, तेजस मराठे यांच्या पथकाने केली आहे.

शहर पोलीस ठाण्यात अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उमेश भांडारकर करीत आहे. चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content