पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात कौंटूबिक हिंसाचाराची मोठी संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एका विकृत पतीने आपल्या पत्नीवर संशय घेऊन तिच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूंनी छिद्र करून त्याला कुलूप ठोकण्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी रात्री पीडितेचा पती रागातच घरी आला. त्याला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यातून त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर घरातील ब्लेडने पीडितेच्या गुप्तांगावर वार केले. एवढेच नाही तर चाकू घेऊन तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. एवढ्यावर त्याचे मन शांत झाले नाही. त्यानंतर त्याने ओढणीच्या मदतीने पत्नीचे दोन्ही हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला छिद्र पाडून त्यात पितळेचे कुलूप बसवले.
त्यानंतर 16 मे रोजी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ती उजेडात आली. 28 वर्षीय पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली. प्रकृती बिघडल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.