गौणखनिज वाहतूक करणारे वाहने पकडले; महसूल प्रशासनाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथील रस्त्यावर  अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर रावेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत दोन्ही वाहने रावेर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की, प्रांताधिकारी कैलास कडलक हे पाल येथे तपासणी साठी गेले होते. पाल येथून येत असताना रस्त्यात त्यांना एक ट्रॅक्टर गैण खनिज मुरूम वाहत असताना आढळले. त्याचबरोबर डंपर सुद्धा दिसले त्यांनी तात्काळ रावेर तहसीलदार बी.ए. कापसे व कार्यालयाचे मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. काही वेळातच तेथे महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  ज्ञानेश्वर लोणारी या मालकाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जानोरी रस्त्यावर आढळून आले. त्यामध्ये १ ब्रारू अवैध मुरूम होता. त्या पाठोपाठ दिलीप धोंडू कोळी यांच्या मालकीचे एक डंपर क्र. एम एच १९ सी वाय ५९३८ यामध्ये २ ब्रास मुरूम आढळून आले. सदर दोन्ही वाहनांचा महसूल विभागाचे मंडळाधिकारी यासीन तडवी, जितेंद्र गवई, श्री बंगाळे, श्री शेलकर, यांच्या सह इतर खिरोदा प्र रावेर निंभोरा बु, ऐनपूर या सर्व मंडळाधिकारी रावेर,पाल व इतर तलाठी, कोतवाल यांनी कारवाई करून पंचनामा केला व सदरची वाहने जप्त करून वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करत सदरची वाहने जप्त करण्यात आलीअसून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

Protected Content