यावल, प्रतिनिधी । येथील पोलीसांनी विविध अपघात किंवा इतर गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी मोटर वाहनांचा बेवारस असलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या पाच दिवसात शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिली.
यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील मागील काही वर्षात घडलेले गुन्हे घात अपघात या विविध प्रकारच्या कारवाईत पोलीसांनी जप्त केलेल्या किंवा हस्तगत केलेल्या वाहन पोलीसांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्यातुन प्राप्त झालेल्या दुचाकी मोटर वाहनांच्या चेचीस क्रमांकाचा आधार घेवुन वाहनमालकांचा शोध घेतले असता ते अद्याप तरी मिळुन आलेले नसल्याने सदर पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासुन पडुन असलेले दुचाकी मोटर वाहन हे खराब स्थितीत आहे . तरी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडुन वाहनांचे मुल्यांकन अनुसार येत्या चार ते पाच दिवसात या दुचाकी वाहनांचा शासकीय प्रक्रीयेनुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिली. येत्या दोन दिवसात संबधीत नागरीकांना वाहनांची ओळख पटविण्याचे अखेरचे आवाहन करण्यात येत आहे. यावल पोलीसांनी जप्त केलेली वाहनाची क्रमांकवारी पुढीलप्रमाणे :- हिरो होन्डा ब्लॅक निळ्या रंगाचा पट्टा क्रमांक एमएच १९डब्लयु२२५०चेचीसक्रमांकo२ डी २० एफ०९६१६ , हिरो होन्डा एमपी ४६ एमजे २४८५ चेचीसक्रमांक एमबीएलएचए११ एएनएफ९बी ४३०१, तिसरे वाहन देखील हीरो होन्डाचेच असुन तिचा क्रमांक आहे एमएच १९ एजे१८२६व चेसीसक्रमांक०५ एफ सिओ५६७७ , हिरो होन्डा क्रमांक नसलेले वाहन चेचीसक्रमांक एमबीएलएचए१८बीएफएफएच५० २७०७ असे असुन पाचवे वाहन देखील हिरो होन्डा कंपनीचे असुन त्याचे क्रमांक एमएच १९ ए एफ५६७७ असे असुन चेचीसक्रमांक०७ सि०९ सि१९४० असे आहेत तर सहाव्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे क्रमांक नसुन या वाहनाचे इंजीन क्रमांक एचए१०ई ए८९८४७४८७ असे आहे या क्रमांकानुसार जर या वाहनांची ओळख होत असेल तर त्या व्यक्तिने आपल्या आधार कार्ड सहीत आवश्यक ती वाहनाशी संबधीत कागदपत्रे घेवुन पोलीस स्टेशनला दोन दिवसात हजर व्हावे असे आवाहन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी केले असुन् , या बेवारस स्थितीत असलेल्या दुचाकी वाहनांचा अखेर लिलाव करण्यात येणार आहे असे ही पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगितले आहे .