जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेमंड चौफुलीजवळ ट्रकमधून गुरांची वाहतूक करणार पिकअप व्हॅन एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत ८ गुरांची सुटक करण्यात आली असून वाहन जप्त केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील रेमंड चौफुलीजवळून बेकायदेशीरित्या पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ७५८) मधून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले. त्यावेळी चालक मोहन कौतीक ढेंगे वय ७२ रा. रिंगणगाव सावदा ता. एरंडोल आणि असलम खान गनी खान वय ४४ रा. जळगाव यांच्याकडे गुरांच्या वाहतूकीबाबतचा परवाना विचारला. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलीसांनी वाहन जप्त केले. त्या वाहतूकर आठ गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी मोहन कौतीक ढेंगे वय ७२ रा. रिंगणगाव सावदा ता. एरंडोल आणि असलम खान गनी खान वय ४४ रा. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.