आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला भाजीपाला बाजार

WhatsApp Image 2019 09 24 at 4.19.47 PM

चोपडा, प्रतिनिधी | यशोधन चैरिटेबल ट्रस्ट संचालित आर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे मंगळवार दि.२४ रोजी व्हेजिटेबल मार्केट धमाका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घरून वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आणून शाळेत भाजीपाला मार्किट चे दृश्य निर्माण केले होते.

या मार्केटमध्ये ३ री तील विद्यार्थी भाजीपाला विक्रेत्याच्या वेशभुषेत आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यानी अस्सल मार्केटचा अनुभव घेतला. कशा प्रकारे भाजीपाला विकत घेतला जातो, घासाघिस कशा प्रकारे केली जाते, पैसे कशा प्रकारे वापरण्यात येतात हे जाणून घेत विद्यार्थ्यानी भाजीपाला खरेदीचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यानी व्हेजिटेबल मार्केट धमाका स्पर्धेत सहभाग नोंदवल्यामुळे वेगवेगळ्या भाज्याची नावे समजण्यास त्यांना मदत झाली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, शाळेच्या प्राचार्या मिस. परमेस्वरी मॅडम , पालक प्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ वाघमारे , भिकन पाटील , अमित लेहेंगे , कविता पाटील, मनीषा पाटील, रुपाली पाटील, प्रतिभा तायडे, सईदा कच्छी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पालकांनी भाजीपाला खरीदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितेश वाघ , दिपाली पाटिल , लिपिका नागदेव, श्रद्धा देशमुख , रिया कलानी , सपना पवार , अनिता पवार आदींनी कामकाज पहिले.

Protected Content