वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील बस स्टॉप चौकात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज रानभाज्या महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन भुसावळ पंचायत समितीच्या सभापती वंदना उन्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिकेल ते विकेल या शासनाच्या धोरणाप्रमाणे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रानभाज्या चे महत्त्व नागरिकांना पटावे रानभाज्या तील गुणधर्म व औषधी धर्म यांचे महत्त्व नागरिकांना पठावे याकरता आज रानभाज्या महोत्सवाचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या विकण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या