धरणगाव प्रतिनिधी । भवरखेडे येथे अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने वीर जिवाजी महाले यांची जयंती सकाळी 9:30 वा. विठ्ठल मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
‘जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची ही जयंती अखिल भारतीय जिवा सेना विभागीय अध्यक्ष बी.एल.खोंडे व भवरखेडा गावचे प्रथम नागरिक सरपंच किरण पाटील, उपसरपंच अजय ब्राह्मणे यांच्या उपस्थितीत जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष बी. एल. खोंडे यांनी वीर जिवाजी महाले यांच्याबद्दल माहिती देताना सांगितले की, जिवाजी महाले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी आपण विविध ठिकाणी जिवा महाले यांची जयंती साजरी करत असतो. जिवाजी महाले यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि पराक्रमी योद्धे होते म्हणून स्वराज्य उभे राहिले अशी माहिती बी. एल. खोंडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना दिली. सरपंच किरण गोकुळ पाटील यांनी देखील वीर जिवाजी महाले यांच्याबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली.
यावेळी अखिल भारतीय जिवा सेनेचे विभागीय अध्यक्ष बी. एल. खोंडे, तालुका अध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले, उपशहराध्यक्ष, सोपान वाकुडे, दिगंबर निकम, कालु आहिरे, गावचे सरपंच किरण गोकुळ पाटील, उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे, ह.भ.प शशिकांत महाराज, संजय भामरे, सतीश पाटील, उगलाल पाटील (ग्रा,पं,सदस्य), दीपक बोरसे, दिगंबर बोरसे, पप्पू पाटील, संतोष बोरसे, पंकज बोरसे, गोलु पाटील व गावातील नागरिक तसेच तरुण मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.