यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीत माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीख निमित त्यांना अभिवादन करण्यात आले.
संपुर्ण महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांची जयंती हा दिवस कृषीदिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने यावल येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात आज कृषी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी, प्रभारी गटविकास अधिकारी के.सी. सपकाळे, तालुका कृषी अधिकारी एल. व्ही. तळेले, चितोडा तालुका यावल येथील आदर्श शेतकरी अतुल पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल महाजन यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास यावल तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते, यावेळी यावल तालुका कृषी अधिकारी एल. व्ही. तळेले यांनी शेतकर्यासाठी राज्य शासनाकडुन मिळणार्या योजनांची माहीती दिली. तर आदर्श शेतकरी अतुल पाटील यांनी शेतकरी बांधवांना केळी पिकांबद्दल विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले. डांभुर्णी चे सरपंच पुरुजीत चौधरी यांनी दुष्काळ व जलसिंचनावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन यावल पंचायत समितीचे कृषी अधिकारी डि.पी. कोते यांनी केले तर प्रस्ताविक आणी उपास्थितांचे आभार यावल पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी डि.एल. हिवराळे यांनी मानले.