जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचालित ‘ओशन इंटरनॅशनल स्कूल’ (ICSE Pattern) येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवार, ८ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध महिलांच्या भूमिकांचे सादरीकरण करून महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांचे अनोखे सादरीकरण
शाळेच्या प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थिनींनी प्रसिद्ध महिलांचे जीवनचरित्र सादर केले: अंशिका जोशी – झांशीची राणी, त्रिशा महाजन – इंदिरा गांधी, अरवी पाटील – आनंदीबाई जोशी, चुली गायकवाड – किरण बेदी, विरती शिंदे – मेरी कॉम, सह्याद्री पाटील – मिस वर्ल्ड, गुजन राजपूत – मिताली राज यांनी सादरीकरण केले.
या सादरीकरणातून विद्यार्थिनींनी स्त्रियांच्या धैर्य, कर्तृत्व आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, शिक्षण, नेतृत्व आणि समाजात महिलांची भूमिका यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी महिला हक्क, समानता आणि शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
शाळेच्या शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि महिलांच्या योगदानावर चर्चा केली. महिला दिनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा दिली. जामनेरमध्ये महिला दिनाच्या अनोख्या साजरीकरणामुळे विद्यार्थ्यांना महिलांच्या कर्तृत्वाची ओळख पटली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.