जळगाव प्रतिनिधी । लोकनेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने मेहरुन परिसरातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात सॅनिटायझर कॅनचे वाटप करुन वृक्षारोपण आणि ऑनलाइन निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजित करण्यात आले.
एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरुन येथे सॅनिटायझरच्या कॅनचे वाटप करुन वृक्षारोपण आणि ऑनलाइन निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यावेळी कार्यक्रमास नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक अशोक लाडवंजारी, नाथ फाऊंडेशनचे डॉ.अभिषेक ठाकूर, भाजपा मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, मिलिंद लोणारी, जमील शहा, योगेश लाडवंजारी, प्रदीप पाटील, वायद भाई खान, उज्वल नाईक, महादेव सोनवणे, सचिन पाटील, कुणाल कुमावत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.