धुळे येथील पत्रकाराला मारहाण प्रकरणाचा विविध पत्रकार संघटनेतर्फे निषेध

धुळे प्रतिनिधी । पुरोगामी पत्रकार संघ धुळे जिल्हयाचे उपसचिव, तसेच शहरातील मिडिया शोध पाक्षिकाचे मुख्य संपादक प्रमोद आनंदा झाल्टे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्‍ल्याचा विविध पत्रकार संघटनेकडुन जाहिर निषेध नोंदविण्यात येत आहे.

रविवार दि. २०सप्टेबर२०२० रोजी धुळे येथील गुलमोहर रेस्टहाऊसमध्ये पुरोगामी पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मिटिंगपुर्वीच पुरोगामी पत्रकार संघाचे धुळे जिल्ह्याचे उपसचिव तसेच मिडिया शोध पाक्षिकाचे मुख्य संपादक प्रमोद आनंदा झाल्टे यांच्यावर, सांयकाळी ४ वाजेच्या दरम्यान, पुर्वनियोजित कट रचुन ८ते १० जणांच्या भ्रष्टाचारी समाजकंटकांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. सदर हल्याने पत्रकार बांधवात तीव्र संतापाची लाट उसळली. पत्रकारांवरील हल्यामुळे, पत्रकारांच्या जीवन रक्षणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ह्या हल्‍ल्याच्या घटनेमुळे तीव्रतेने ऐरणीवर आलेला आहे. शासनाने पत्रकारांना संरक्षण देवुन, देशाचा चौथा आधारस्तंभ असणा-या, पत्रकारांवर हल्ले करणा-या समाजकंटकास त्वरीत कठोर शासन करावे. अशी मागणी निवेदनाव्दारे पुरोगामी पत्रकार संघासह समस्त विविध पत्रकार संघनेतर्फे करण्यात आली.

मिडिया शोध पाक्षिकाचे मुख्य संपादक प्रमोद आनंदा झाल्टे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा विविध पत्रकार संघटनेकडुन जाहिर निषेध नोंदविण्यात येत आहे. पोलीस वार्ता न्यूज पेपर परिवारातर्फे मिडिया शोध पाक्षिकाचे मुख्य संपादक प्रमोद आनंदा झाल्टे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा जाहिर निषेध करण्यात येत असुन,पत्रकारांना शासनाने संरक्षण देवुन,संबधित  हल्लेखोर समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी. अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.

 

Protected Content