शेंदुर्णी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रम

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील अ. र. भा. गरुड महाविद्यालयात रासेयो, इतिहास व ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल प्रा. डी. एच. धारगावे यांनी ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. उपस्थिताना म. गांधी तसेच जागतीक किर्तीच्या विचारवंतांच्या ग्रंथांचा परीचय व्हावा, यासाठी प्रदर्शनी सजविण्यात आलेली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविकातून म. गांधी  आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.

प्रमुख वक्ते डॉ. भूषण पाटील यांनी गांधींजींनी सांगितलेल्या सत्याचे प्रयोग आज समाज जीवनात करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध काळात जग होरपळत असतांनाच्या काळात गांधींनी धुरा सांभाळत दिशादर्शक स्वरूपाचे कार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गांधी अति प्राचीन अशा भारतीय संस्कृतीचे उदगाते असल्याचे त्यांनी व्याख्यानातून स्पष्ट केले लाल बहादुर शास्त्री यांना अधिक काळ नियतीने दिला असता तर देशाचा वर्तमान आणखी उजाळला असता असेही ते लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती प्रित्यर्थ म्हणाले.

उपप्राचार्य तथा राज्य शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ. संजय भोळे यांनी आजच्या युगात गांधी विचारांची नितांत गरज असल्याचे अध्यक्षीय भाषणातून मांडले. या प्रसंगी प्रा. अप्पा महाजन, प्रा.पी. जे. सोनवणे, डॉ. महेश पाटील, डॉ. व्ही. एन. पतंगे, प्रा. अमर जावळे, डॉ. आजिनाथ जिवरग, प्रशासकीय प्रतिनिधी सतीष बावीस्कर व हितेंद्र गरुड तसेच मोहन पाटील आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Protected Content