भारतरत्न माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

WhatsApp Image 2019 12 25 at 6.42.49 PM

जळगाव, प्रतिनिधी | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या आज दिनांक २५ डिसेंबर रोजी ९५ वी जयंती निमित्त त्यांना भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरातर्फे प्रतिमा पूजन अन्नदान विविध सामाजिक उपक्रमांनी श्रद्धेय अटलजींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सकाळी १०.०० वाजता जिल्हा रुग्णालय येथे गरजू रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच दुपारी ४.०० भाजप कार्यालय येथे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले
. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अँड. सुचीता हाडा, डॉ. राधेश्याम चौधरी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दिपक सूर्यवंशी, जिल्हापदाधिकारी सुभाष तात्या शौचे, अजय जोशी, संजय शिंदे, जि.प सदस्य मनोहर पाटील, नगरसेविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, नगरसेवक राजू मराठे, महेश चौधरी, किशोर बाविस्कर, भरत कोळी, नवनाथ दारकुंडे, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, सुशील हासवाणी, परेश जगताप, रमेश जोगी, कपिल पाटील, विनोद मराठे, अनिल जोशी, आरती शिंपी, प्रकाश पंडित, केशव नारखेडे, जयेश भावसार, प्रभाकर तायडे, विरेंद्र राजपूत, श्याम भावसार, स्वप्नील साकळीकर उपस्थित होते. मंडल ९ मध्ये सुद्धा अटलजींच्या प्रतिमेचे पूजन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content