भुसावळ प्रतिनिधी । राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ. रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतपासणी फी मध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
येत्या २१ ऑक्टोबरला मतदान केल्यानंतर हे अभियान २१ ते २७ ऑक्टोबर वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी 100 टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शासन,प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात. या लोकशाही उत्सवासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्य यांनी सदर उपक्रम आयोजीत केला आहे.मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
भुसावळ, मुक्ताईनगर, यावल-रावेर विधानसभेतील मतदारांना याचा फायदा होणार आहे. डॉ.पाटील दाम्पत्य यांनी वासुदेव नेत्रालय सुरु झाल्यापासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत आदी विविध निवडणुकीत सदर उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राबवलेलेया उपक्रमाबद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून वासुदेव नेत्रालायला विशेष गौरवपत्र प्राप्त झाले होते.
सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक – ॲड.डॉ.नितु पाटील
प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय.मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे.तेव्ह्या प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी दि.२१ ते २७ ऑक्टोबर या काळात नेत्र तपासणी शुल्कात ५०% सूट मिळणार आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी.