वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत सोमवारी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयातून काढण्यात आली.
यावेळी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुरळकर मुख्यधिकारी शेख समिर, प्रशासकीय अधिकारी पंकज सुर्यवंशी होते. आरक्षण सोडत निधी निलेश झांबरे हिच्या हस्ते करण्यात आले. 10 प्रभागातील 21 जागांची आरक्षण सोडत आरक्षण काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6 पर्यंत सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशा एकूण 12 जागांची सोडत काढण्यात आली.
प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण तर शेवटच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये तीन उमेदवार असून यामध्ये सर्वसाधारण महिला दोन जागा व अनुसूचित जाती सर्वसाधारण एक जागेची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.