वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

raver news

 

रावेर प्रतिनिधी । जून महिन्यात सुध्दा उन्हाचा पारा वाढल्याने जीवाची लाहीलाही होत आहे. सातपुड्याच्या पर्वत अभयारण्य भागात यावर्षी उष्णतेने उच्‍चांक गाठला आहे. त्यातच वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हणजेच, कोणतीही भीती न बाळगता माकडांनी आपला मोर्चा, थेट गाववस्तीकडे स्थालंतर करत असलेल्या चित्र दिसत आहे.

असेच तहानलेले माकड पाण्याच्या शोध घेत असतांना ते पाल परिसरात पोहचले. हे माकड परिसरातील जलवाहिणीच्या गळीत असलेल्या पाणी पित असतांनाच, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे हे पालला पेट्रोलिंगसाठी जात होते, व त्यांनी हे दृश्य मोबाईल मध्ये टिपले. ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने, जलस्रोतही कोरडे पडले आहेत. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या भागातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भागातून वन्यप्राणी गाव वस्तीवर येऊन पिण्याच्या पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र ग्रामीण भागातही खेडेगाव व शेतवस्तीवरील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदी, नाले व सिंचन विहिरी कोरडे-ठाक पडले आहेत. त्यामुळे उन्हाच्या कडाक्‍याने पानझड झालेल्या वृक्षांखाली सावलीच नसल्याने प्राण्याच्या विश्रांतीचा आश्रयही आता नष्ट झाला आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याने पाण्याच्या शोधात तहानलेल्या वानर सेनेने जंगल सोडून गाव व वस्त्याकडे येण्यास सुरवात केली आहे. तालुक्‍यात वानरांच-वावर मोठ्या प्रमाणात असून दिवसभरात अन्नपाण्याचा शोध घेत, फिरणारी वानरसेना अनेक ठिकाणी दिसत आहे. तालुक्‍यात डोंगराळ भाग असल्यामुळे तसेच दाट जंगल असल्याने या भागात वानरे मोठ्या संख्येने राहतात. डोंगराळ भागात वन्य प्राण्यांसाठी वन-विभागाने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Protected Content