अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव व गडखांब ग्रुप ग्रामस्थ ता.अमळनेर यांचा संयुक्त विद्यमाने येथील गावा जवळच्या नदीनाल्यावर वनराई बंधारा तयार करण्यात आला.
यावेळी गावातील जेष्ठ मंडळी तसेच गावातील ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितीन बापूराव पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दिनकर बोरसे, दिलीप गिरधर पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गावकरी अनिल पाटील, मधुकर पाटील,दगडू यादवराव,रावसाहेब पाटील, भैय्या पाटील,भाईदास पाटील,नामदेव पाटील,सुरज पाटील, ज्ञानेश्वर पाटील,आबा कोळी, महेंद्र पाटील,शिवाजी पाटील, नितीन विनायक पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कै. खुशाल दादा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे विध्यार्थ्यांनी देखील भाग घेतला तसेच केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समग्र कृषि व ग्रामीण विकास प्रकल्प चे पाणलोट सहायक संदेश पाटील उपस्थित होते.
समग्र कृषि व ग्रामीण विकास प्रकल्पचे प्रकल्प प्रमुख श्री. अनिल भोकरे व प्रकल्प व्यवस्थापक आदित्य सावळे यांनी दूरध्वनी द्वारे मार्गदर्शन केले. पाणी आडवा, पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व आश्रम शाळेचे विद्यार्थी यांचेही कौतुक होत आहे.