धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; वृध्दावर गुन्हा दाखल


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय मुकबधिर असल्याचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एका वृध्दावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलीचे आईही मजूरी कामासाठी अहमदनगर येथे गेलेल्या होत्या. याचा फायदा घेत १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा संशयित आरोपी राजधर अंबर सैंदाणे वय ७० याने पिडीत मुलगी ही अंगणात खेळत असतांना तिला घरात बोलावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार गावातील एका आजीने फोन करून पिडीत मुलीच्या आईला सांगितला. त्यानुसार तिची आई घरी आल्यानंतर बुधवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी राजधर सैंदाणे या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहे.