यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यातील कबुनुर येथे समाज मंदीराची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांचा जाहीर निषेध करत तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन श्री विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आले.
या संदर्भात श्री विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या यावल तालुका शाखाच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळील कबनुर या गावातील सुतार गल्लीत असलेल्या विश्वकर्मा समाजाच्या समाज मंदीरात शनिवार, दि. २३ जुलैच्या रात्री १ वाजुन ३० मिनिटांनी काही समाजकंटकांनी समुहाने एकत्रीत येवून सुतार गल्ली येथील समाजाची अस्मिता असलेले समाजमंदीराची तोडफोड करीत दहशत निर्माण करीत नुकसान केले आहे.
या समाजकंटकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबनुर, इलकरंजी गावातील समाज बांधवांनी समाजकंटकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली व ती दिलेली तक्रार तात्काळ मागे घ्यावी. यासाठी मोठया प्रमाणावर दबाव टाकण्यात असून अशा परिस्थितीत आमच्या बांधकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या सर्व घटनेची प्रशासनाने तात्काळ गांर्भीयांने दखल घेवून घटनेतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी तसे अन्यथा न झाल्यास सामाजिक पातळीवर संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात येइल. असा इशारा यावल तालुका श्री विश्वकर्मा वंशिय समाज संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर चेतन अढळकर, प्रशांत इंगळे, भागवत दांडेकर, कृष्णा सुतार , गणेश अढळकर, प्रभाकर अढळकर, रविंद्र अढळकर, संतोष अढळकर, सुनिल रूले, हेमंत लोहार, सागर लोहार, विशाल अढळकर, गोविंदा अढळकर, भुषण दांडेकर, रघुनाथ अढळकर, ज्ञानेश्र्वर अढळकर, रोहीत सुतार यांच्यासह इतर समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.