पारोळ्यात पाच दिवसीय बालाजी कथेची यशस्वी सांगता

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रावण महिना व  गोकुळ अष्टमी निमित्त मोठे राम मंदिर संस्थान तर्फे मोठे राममंदिरात सुरु असलेल्या पाच दिवशीय श्री बालाजी कथेची दि.०९ सप्टेंबर रोजी सांगता करण्यात आली.

५ ते ९ सप्टेंबर अशा पाच दिवशीय श्री युवराज स्वामी, डॉ. माधव प्रपन्नाचार्य, उज्जैन यांचा सुमधुर वाणीने श्री बालाजी कथा मोठे राम मंदिर येथे आयोजीत करण्यात आली होती. मंगळवार ०५ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झालेली कथा दि.०९ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० कथा, दुपारी १ वाजता मा.खा.ऐ.टी. नाना पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. दुपारी १ ते ३ दरम्यान महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.

पाच दिवशीय कथेत रोज सकाळी विविध मान्यवरांच्याहस्ते महापुजा करण्यात आली. यात मुख्य मानकरी म्हणून प्राथमिक शिक्षक गुणवंत चौधरी हे होते तर पाच दिवसात महापुजेचा मान शहरातील विविध मान्यवरांना देण्यात आला. त्याचप्रमाणे दिवसात दोन वेळा होणाऱ्या आरतीचा मान देखील शहरातील विविध मान्यवरांना देण्यात आला. पारोळा शहरात प्रथमच श्री बालाजी कथा झाली. या कथेतून श्री बालाजी महाराजांसदर्भातली माहिती यावेळी सांगण्यात आली.

५, ६, ७, ८, ९ रोजी झालेल्या कथेत महाराजांनी अनेक विषयांना हात घालत शिक्षण, संस्कार, सनातन, हिंदु धर्म, गोमातेचे महत्त्व, हिंदु धर्माची परंपरा, सणांचे महत्त्व, महाभारत, रामायणातील अनेक दाखले, वेध, युग अशा अनेक विषयांमध्ये सखोल मार्गदर्शन तथा प्रबोधन केले. पाच दिवस चाललेल्या कथेत शहरातील अनेक भाविक भक्तांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या कथेचा लाभ घेतला. सदर कथेचे लाईव्ह प्रक्षेपण स्थानिक टीव्ही चॅनल बी टीव्ही मराठी यांनी केले होते. श्री जगदीश शर्मा जी व सौ. कौशल्या ताई शर्मा यांनी स्वामीजी उत्तम व्यवस्था केली.

यावेळी डॉ. संभाजीराजे पाटील फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिरही घेण्यात आले. दरम्यान पाच दिवसात विविध मान्यवरांनी भेटी ही दिल्यात. यात आ. चिमणराव आबा पाटील, मा.खा.ऐ.टी. नाना पाटील, पोलिस निरीक्षक सुनील पवार, मा. नगराध्यक्ष दयारामअण्णा पाटील, सुरेंद्रभाऊ बोहरा, प्रविणशेठ दाणेज, प्रमोदशेठ कासार, राजेंद्र कासार, कृउबा समितीचे उपसभापती सुधाकर पाटील (पिंटूभाऊ), बालाजी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी व संचालक मंडळ, व्यंकटेश महाप्रसाद समितीचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केशवअण्णा क्षत्रीय, पत्रकार भुपेंद्रभाऊ मराठे, डॉ. सुरेश पाटील, तेली समाजाचे अमृतशेठ चौधरी, भागवत चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, रा.यु.कॉ. चे जिल्हा उपाध्यक्ष कपील चौधरी यांच्यासह तालुका व धुळे येथील भाविकांनी देखील उपस्थिती लावली.

श्री बालाजी स्वयंसेवकांनी रोज पाणी व प्रसाद वाटप केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्वस्त गोपालशेठ अग्रवाल, अॅड. दत्ताजी महाजन, अर्जुनशेठ भोसले, डॉ. अनिल गुजराथी, कल्पेशशेठ अग्रवाल, मोठे राम मंदिराचे पुजारी हरीनारायण महाराज यांच्यासह विश्वास कोळी सर, भोलाभाऊ भावसार, प्रकाश पाटील, दिलीपशेठ मालपुरे, पत्रकार भिका चौधरी, जितेंद्र शेवाळकर, अमोल वाणी, डोंगर चौधरी, अरुण भोई ठेकेदार, गोपीचंद चौधरी, लक्ष्मीकात भावसार, केशवअण्णा क्षत्रिय, सुरेश चौधरी, आनंदा नेरकर, चंद्रकांत शेठ शिंपी व राम भक्तांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन विश्वास कोळी सर यांनी केले. तर आभार कल्पेशशेठ अग्रवाल यांनी मानले.

Protected Content