पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील साईबाबा मंदिर परिसरात होत असलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्याची पूर्वतयारी उधळत केलेली तोडफोड राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, पाळधी येथे पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपाचा कार्यकर्ते पाळधी येथे आयोजित करण्यात आला आहे. परंतू काल रात्री १ वाजेच्या सुमारास मेळाव्याच्या ठिकाणी काही अज्ञात लोकांनी येऊन तोडफोड केली. तसेच स्वयंपाक चालू असताना भांडे व भाज्या फेकत खुर्च्यांच्याही तोडल्या. याप्रकरणी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना भाजपचे नेते पी.सी.पाटील यांनी सांगितले की, ही तोडफोड राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाली आहे. तर बाजार समितीचे माजी सभापती लकी पाटील यांनी सांगितले की, माझ्या व्याही यांना फोन करून धमक्या देण्यात आल्या. त्यांना सांगण्यात आले की, लकी अण्णाला सांगा पाळधीत मेळावा घ्यायचा नाही. तर रात्री आमच्याविरुद्ध घोषणाबाजी करून शिवीगाळ केली. तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनी गुलाबराव पाटील हे कायमच भाजपवर अन्याय करत आले आहेत. परंतू यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाहीत,असे म्हटले. तर चंद्रशेखर अत्तरदे यांनी देखील गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.