Home Cities जळगाव वाल्मिकी समाजातर्फे जाहरवीर गोगादेव जयंती उत्साहात साजरी

वाल्मिकी समाजातर्फे जाहरवीर गोगादेव जयंती उत्साहात साजरी

0
128


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत श्री जाहरवीर गोगादेव चौहान आणि श्री रत्नावीर जी चांवरिया महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, १७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते सुरज पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा केला.

या जयंती सोहळ्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमांतर्गत महाप्रसाद वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांसाठी आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी ज्यूस वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. फुले मार्केट येथे सुरज पवार मित्र परिवाराच्या वतीने एक आकर्षक स्वागत स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवरून येणाऱ्या मिरवणुकीचे आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे सुरज पवार यांनी उत्साहात स्वागत केले.

या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत भाजप महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, तसेच समाजसेवक सागर सपके आणि समाजसेविका रूपालीताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन घुसर, विक्रम सारवाण, लखन सारवाण, सोनू सारवाण, सुरज सारवाण, अर्जुन पवार, राहुल पवार, रोहित पवार यांच्यासह सुरज पवार मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound