रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रावेर पंचायत समिती मधील वैयक्तिक शौचालय योजनेच्या अनुदान गैरव्यवहार प्रकरणी संबंधीत सर्वांवर त्वरीत कारवाई करा, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे पोलिस उपनिरिक्षक मनोहर जाधव यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
रावेर पंचायत समिती मध्ये गत सुमारे तीन महिन्यांपुर्वी वैयक्तिक शौचालय योजनेच्या अनुदानात सुमारे दिड कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे व यात अनेक संबंधीत असल्याने रावेर पोलिस स्टेशनला संबंधाने गुन्हा दाखल आहे.यात एकूण शेकडो आरोपीं पैकी जवळपास बारा आरोपींची ताब्यात घेवून चौकशी होत असल्याचे जाहीर झाले आहे.
या गुन्ह्याची एकूणच व्याप्ती पाहता व रावेर तालुक्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या रकमेचा गुन्हा पाहता याबाबत उत्सुकता देखील शिगेला पोहचली असून यात संबंधीत वरिष्ठांना व इतर आरोपींना त्वरीत ताब्यात घेण्यात येवून गैरव्यवहाराचे सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कार्यवाही व्हावी व गैरव्यवहाराची रक्कम दोषींकडून वसूल करण्याची मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे.
यावेळी लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा संयोजक युवराज महाजन तालुका प्रमुख भाऊराव पाटील उपस्थित होते.