रावेर पोलीस इन अ‍ॅक्शन मोड : कोविडच्या नियमांच्या पालनासाठी तपासणी

रावेर प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी शहरातील टेन्ट हाऊस मंगल कार्यालय मालकांसह आठवडे बाजार ठेकेदार यांची बैठक घेत नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरात नियमांच्या पालनासाठी नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे.

रावेर पोलीस स्टेशन येथे उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलीस पाटील,टेन्ट हाऊस /मंगल कार्यालय मालकांची तसेच आठवडी बाजारचे ठेकेदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार,आठवडी बाजार पुढील आदेशापर्यन्त बंद राहील तसेच अंत्यविधी करिता फक्त २० लोकांना व दि २० पासून लॉन्स,मंगल कार्यालय ,हॉल्स, सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

कोविड नियमावलीचे पालन करून घरच्याघरी शास्त्रोक्त पद्धतीने अथवा नोंदणीकृत विवाह पद्धतीने साजरा करण्यात यावेत.नोंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींनी तसेच सर्व धार्मिक स्थळी ५ पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. सर्व दुकाने वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत चालू राहतील अश्या सुचना देण्यात आल्या. तसेच जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची प्रत तसेच सिआरपिसी१४९ ची नोटीस देण्यात आली.तसेच कोणत्याही कार्यक्रमात गर्दी होणार नाही शासनाने निर्गमित केलेले नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासोबत रावेर शहरात कोरोनाच्या नियमांचे पालन होते की नाही ? यासाठी पोलिसांतर्फे शहरात नियमितपणे तपासणी देखील करण्यात येत आहे.

Protected Content