जळगाव प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या पावसामुळे वाघूर धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून लवकरच येथून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
जळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघूर धरणामध्ये सुमारे ९९ टक्के पाणीसाठा झालेला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता वाघूर धरणाची जलपातळी २३३.८०० मीटर होती. यामुळे धरणासाठा ९७.२० टक्के झालेला होता. तर दिवभरातील पावसामुळे हे प्रमाण अजून वाढले असून ते ९९ टक्क्यांच्या आसपास आहे.
वाघूर धरणामध्ये अतिरिक्त पाणी येणे सुरु झाल्यास तात्काळ धरणाचे वक्रव्दारे उघडून वाघूर नदीमध्ये कोणत्याही क्षणी विसर्ग सोडावा लागेल. त्यामुळे वाघूर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. वाघूर नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना यांना कळवले आहे.