पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयात लसीकरण केंद्र कार्यान्वित

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दल, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामानाने जिल्हा पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांसाठी आज २१ पासून कोवीड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले. 

जळगाव जिल्ह्यात एकुण ४२ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. कोवीड काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी पहिल्या फ्रेम मध्ये होते. अपात्कालीन काळात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये चोख बजावत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दल, जिल्हा सामान्य रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल येथे आज २१ एप्रिल पासून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, त्याच्या पत्नी डॉ. अमृता मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण, पोलीस उपअधिक्षक डी.एम.पाटील, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, राखीव पोली उपनिरीक्षक भारत चौधरी, जिल्हा रूग्णालयातील जयश्री वानखेडे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, डॉ. प्रसन्नकुमार रेसदाणी आदी उपस्थित होते.अ

 

Protected Content