एरंडोल प्रतिनिधी । कोरोना महामारीपासुन वाचण्यासाठी तालुक्यातील पिंपळकोठा पिंपरी बुद्रुक येथील लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी संभाव्य धोका टाळ्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी लस जरुर घ्यावी व आपल्यासोबत इतरांचीही काळजी करावी, असे लस घेते वेळी पिंप्री बु येथील प्रगतीशील प्रौढ शेतकरी साहेबराव पाटील यांनी मत व्यक्त केले. तसेच लस देण्यासाठी रिंगणगाव स्वास्थ्य केंद्र येथील डॉ. धीरज मराठे, डॉ. भगाळे सोबत आरोग्य सेविका सुनिता चौधरी, सीएचओ शेख, आरोग्य सेवक आंधळे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका वर्षा बावीस्कर आणि कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते एसआर. पाटील, बबलू पाटील, अशोक पाटील, भाऊसाहेब पाटील, फकीरा विसपुते आणि श्रावण मोठा यांनी परिश्रम घेतले.