मुंबई (वृत्तसंस्था) गुन्हा केला की नाही? हे त्या गुन्हेगाराने सिद्ध करायचे असा हा विचित्र कायदा आहे. तसेच विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी ईडी हे शस्त्र म्हणून वापरले जातं असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
या देशातील राजकीय पक्षांनी या कायद्यातील ज्या राक्षसी तरतुदी आहेत. त्यात सुधारणा केली पाहिजे. आज विरोधकांवर वेळ आली आहे उद्या दुसऱ्यांवर येईल. हे लोकशाहीसाठी योग्य नाही असेही भुजबळ म्हणाले. शरद पवारांचा त्या बँकेशी काहीही संबंध नाही, बँकेत संचालक झाले नाही, कधी कुणाला आदेश दिला नाही. त्यामुळे पवारांवर असा गुन्हा दाखल करणे याचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. पवारा़ंवरील गुन्ह्याच्या निषेध राज्यातील सर्व जनतेने केला पाहिजे.